कोल्हापूर
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीच्य निकालाविषयी विविध स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश जाधव यांनी विधानसभा निकालाविषयी खंत व्यक्त केली.
अंबाबाईचे दर्शन घेतल्यावर माध्यामांशी बोलताना अविनाश जाधव म्हणाले, मागच्या काही दिवसांपासून जे व्हिडीओ येत आहेत, ते जर पाहिले तर कशाप्रकारचे रिझल्टस् बनवले गेले हे दिसून येते. कारण आम्हाला एवढा वाईट रिझल्ट येईल हे अपेक्षित नाही किंवा हे मान्यही नाही. कारण ज्या पद्धतीने महाराष्ट्र सैनिकांनी कोव्हीड मध्ये किंवा मागच्या पाच वर्षात काम केले, त्यानंतर दहा दहा वर्ष जे नेते कोणाच्या घरी जात नव्हते कोणाला भेटत न्हवते, असे आमदार लाख लाख मतांनी निवडून येतात ? हे अशक्य आणि आकलनिय आहे. इव्हीएमशिवाय हे शक्य नाही असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी व्यक्त केले.
राज ठाकरे साहेब लवकरचं त्यांची भूमिका मांडतील. पण पक्षनेते म्हणून मला विचाराल, तर खात्रीने सांगतो आम्ही काम केलेलं, लोकांमध्ये गेलेलो. प्रचारा दरम्यान लोक आमदारांना शिव्या देत होते. काही ठिकाणी तर अशी परिस्थिती होती की आमदार कोण आहे माहित न्हवतं. अशा ठिकाणी तुमचं मत आहे, की लोकांनी डोळे झाकून मतदान केलं असेल तर मला असं वाटतं की ही गोष्ट खोटी आहे, असे मत अविनाश जाधव यांनी व्यक्त केले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








