ऑनलाईन टीम / तरुण भारत :
महावितरण कंपनीच्या खासगीकरणाविरोधात कर्मचाऱ्यांनी तीन दिवसांचा संप पुकारला होता. दरम्यान, या संपावर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी वीज कर्मचाऱ्यांच्या 32 संघटनांसोबत बैठक घेतली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर अखेर या संपावर तोडगा निघाला.
यासंदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले की, वीज कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी आज दुपारी कर्मचाऱ्यांच्या 32 संघटनांसोबत सकारात्मक चर्चा झाली. जलविद्युत प्रकल्पाबाबतही बैठकीत चर्चा झाली. सरकार वीज कंपन्यांमध्ये 50 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. राज्य सरकार महावितरणचं खासगीकरण करणार नाही, असे आश्वासन वीज कर्मचाऱ्यांना देण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या चार ते पाच मुद्यांवर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर संपावर तोडगा निघाला.
अधिक वाचा : महाराष्ट्रात थंडी आणखी वाढणार
दरम्यान, बैठकीनंतर वीज कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी संप मागे घेत असल्याचे जाहीर केले.