नाशिक पदवीधर मतदारसंघात कॉंग्रेस (Congress) पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. सुधीर तांबे (Sudhir Tambe) यानी पक्षाचा एबी फॉर्म मिळूनही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. सुधीर तांबे आणि त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी केलेल्या कृतीबद्दल कॉंग्रेस पक्षाने सुधीर तांबे यांच्यावर कारवाई करून त्यांच पक्षातून निलंबन केले. त्यानंतर गेल्या काही दिवसात घडलेल्या राजकिय घडामोडीमुळे कॉंग्रेस नेते सत्यजीत तांबे भाजपच्या जवळ जात असल्याचे निदर्शनास आल्यावर कॉंग्रेसच्या दिल्ली हायकमांडने तांबेंवर निलंबनाची कारवाई करण्याच्या वाढवल्या आहेत. त्यातच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून शुभांगी पाटील यांना पाठींबा जाहीर केला आहे.
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, “निलंबनाबाबत जो काही निर्णय द्यायचा तो हायकमांड देईलच. पक्षांतर्गत आमचे जे निर्णय झाले आहेत त्याप्रमाणे कार्यवाही सुरू झाली आहे. नागपूरची जागा काँग्रेसला देण्यात आली आहे आणि नाशिकमध्ये आम्ही महाविकासआघाडीच्या उमेदवार म्हणून शुभांगी पाटील आमच्या उमेदवार आहेत आणि त्यांना आमचा पाठींबा राहील.”
याअगोदरच शिवसेनेच्या ठाकरे गटाने शुभांगी पाटील य़ांना आपला पाठींबा जाहीर केला होता. तर आज दुपारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून शुभांगी पाटील यांचे नाव जाहीर केले.
Previous Articleपंच मारुती सातव यांना धमकीचा फोन येताच सिकंदर शेखची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, अन्यायाबद्दल …
Next Article Ratnagiri : खेडमध्ये व्हेलची उलटी जप्त; तिघे अटकेत








