महाविकास आघाडी ही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची गरज आहे. शरद पवार हे आजही भाजपसोबत असल्याचा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. याच बरोबर राष्ट्रिय स्वयंसेवक संघाने आपली विचारसरणी बदलल्यास आपणास भाजपबरोबरही जाण्यास कोणतीच अडचण नसल्याचा खुलासा त्यांनी केला. ते आज एका खाजगी वाहीनीवर मुलाखतीमध्ये बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले, “राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजपबरोबर 2019 लाच गेलेली आहे. फडणवीस सरकार पडल्यावर महाविकास आघाडीचा प्रयोग हा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची गरज होती. मला महाविकास आघाडीमध्ये घ्य़ाय़चे की नाही याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील.” असे ते म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी आरएसएस बरोबर आपले वैचारित मतभेद आहेत. संघ आपली विचारसरणी बदलणार असल्यास आपणास भाजपबरोबर जाण्यास कोणी रोखू शकत नसल्याचे आंबेडकरांनी म्हटले आहे.
कॉंग्रेसबाबत आपली भूमिका मांडताना ते म्हणाले, “राहूल गांधी यात्रेत चालले याबद्दल त्यांचे अभिनंदन, त्यांनी स्वत:ची प्रतिमा बदलण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. आता ते राजकारणात गंभीर असल्याचे दिसत आहेत. पण कॉंग्रेसची धर्मनिरपेक्षवादाची व्याख्या वेगळी असून आंबेडकर चळवळीची वेगळी आहे. कॉंग्रेस धर्मात हस्तक्षेप करत नाही. तर तळातील लोकांच्या उद्धारासाठी धर्मामध्ये हस्तक्षेप महत्वाचा असल्याचे आपण मानतो.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









