Jayant Patil : शिवसेना आमदारांना विधानसभा कामकाज सल्लागार समितीवर घेण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना भेटून मागणी करणार असल्याचे राष्ट्रवादी काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन 17 ते 25 ऑगस्टला होणार आहे. विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकित निर्णय घेण्यात आला. यानंतर त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. महाविकास आघाडी पर्मनंट आघाडी नाही, अस वक्तव्य नाना पटोले यांनी केलं होत. यासंदर्भात जयंत पाटलांनी बोलणं टाळलं.
यावेळी बोलताना ते म्हणाले, मविआ अस्तित्वात आहे. आज झालेल्या बैठकिला सर्वजण उपस्थित होते. विरोधी पक्षाची भूमिका कशी असावी याबाबत विचार केला असल्याचेही त्यांनी सांगितले. भाजपाला ज्यांना विरोध करायचा आहे. त्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. शिवसेना अधिकृत पक्ष आहे. कामकाज सल्लागार समितीवर सेना असली पाहिजे. यासाठी अध्यक्षांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जास्त संख्याबळ ज्यांच्याकडे आहे तो विरोधपक्ष होतो. अशी पूर्वीपासूनची परंपरा आहे. अंबादास दानवेंची निवड करताना आम्हाला विश्वासात घेतलं नाही अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.
राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांकडे सरकारचे लक्ष नाही. सरकार अधिवेशनापासून पळ काढतयं. 6 दिवसात अधिवेशन गुंडाळने योग्य नाही. महागाईसारखे प्रश्न, जनतेच्या मनात असलेले प्रश्न अधिवेशनात मांडणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








