आज मविआने नाशिकमध्ये शुभांगी पाटील आणि नागपूरमध्ये सुधाकर आडबालेंना पाठिंबा देण्याचे निश्चित केल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. महाराष्ट्रात मविआचे पाचही उमेदवार जिंकतील असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला. कालपर्यंत आम्ही कोणतीही भूमिका जाहिर केली नव्हती. आज पक्षाने भूमिका जाहिर केली आहे. आता सगळेजण एकसंघ काम करतील असेही ते म्हणाले. अखेर महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकित पाठिंबा देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला.
यावेळी बोलताना ते म्ङणाले की, विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्यावर काँग्रेसने निलंबनाची कारवाई केल्याचेही त्यांनी सांगितले. सत्यजित तांबे यांच्यावर आजच कारवाई करण्यात आल्याचीही त्यांनी माहिती दिली.
Previous Articleशिवसेना ठाकरे गटाच्या बैठकीत कै.आतू फर्नांडिस यांना श्रद्धांजली
Next Article जिमखाना मैदानावर उद्या क्रिकेटचा महासंग्राम








