मुंबई: राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आज महाविकास आघाडीतील प्रमुख नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्या भेटीला गेले.यावेळी भाजपाने आपला उमेदवार मागे घ्यावा अशी विनंती केल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली. बैठक संपल्यानंतर माध्यमांशी त्य़ांनी संवाद साधला.
राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मविआ प्रयत्न करत आहे. राज्यसभेच्या बदल्यात विधान परिषदेमध्ये एक उमेदवार आम्ही तुम्हाला वाढवून देऊ अशी ऑफर दिल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे विधान परिषदेची निवडणूकही बिनविरोध होण्यास भाजपाला मदत होईल असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, फडणवीस यांना मतांची आकडेवारी सांगितली. त्यांच्यापेक्षा संख्याबळानुसार मविआकडे शिल्लक मतांची संख्या जास्त आहे. उमेदवारी अर्ज 3 पर्यंत मागे घ्यायचा आहे. दरम्यान फडणवीसांशी एका तासाने पुन्हा बोलणार असून, यावर चर्चा होईल असेही ते म्हणाले. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मविआच्य़ा प्रयत्नांना यश मिळेल असं वाटतयं असेही ते म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








