भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
वार्ताहर/ उचगाव
येथील रामलिंग मंदिर परिसरात महाशिवरात्रीचा सोहळा उत्साहात पार पडला. महाप्रसादाला उचगाव आणि परिसरातील जवळपास 4000 भाविकांनी उपस्थिती दर्शवून महाप्रसादाचा लाभ घेतला. सकाळी आठ वाजल्यापासूनच महाप्रसादाला प्रारंभ करण्यात आला होता.
शुक्रवारपासून सुरू झालेल्या विविध उपक्रम, पूजा, आरती, अभिषेक, प्रवचन, कीर्तन अशा कार्यक्रमानंतर शनिवारी पहाटे महाआरती होऊन नैवेद्य समर्पित केल्यानंतर सकाळी आठ वाजता महाप्रसादाला प्रारंभ करण्यात आला.
या महाप्रसादासाठी अनेक भाविकांनी रोख रक्कम व वस्तूच्या स्वरूपात साहित्य दिल्याने देणगीदारांचे आभार मानण्यात आले. दुपारी चारपर्यंत महाप्रसादाचा लाभ घेतला. रामलिंग सेवा अभिवृद्धी संघामार्फत गेले दोन दिवस या संघाच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्र्रम घेऊन हा महाशिवरात्रीचा उत्सव पार पाडला.









