प्रतिनिधी/ म्हापसा
बार्देश तालुक्यात महाशिवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. भाविकांनी देवदर्शनासाठी सकाळपासूनच एकच गर्दी केली होती. बार्देश तालुक्यात काणका येथील श्री विश्वाटी विश्वेश्वर शिवशंकर मंदिरात भाविकांना लिंगावर स्वहस्ते लिंग अभिषेक करण्यास सोय करण्यात आली होती. त्यामुळे येथे नागरिकांनी एकच गर्दी केली होती. पहाटे 3 वाजल्यापासून रात्री उशीरापर्यंत भाविकांची येथे अलोट गर्दी पहायला मिळाली. बार्देश तालुक्यात लिंगभाट पर्रा, काणका विश्वाटी शिवशंकर मंदिर, खोर्ली म्हापसा लिंगेश्वर मंदिर, कांदोळी शिवमंदिर, आसगाव वागाथोर येथील शिवमंदिर, अस्नोडा कैलासनगर टेकडीवर तसेच थिवी गणपती मंदिर आदी ठिकाणी शिवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. शिवरात्रोत्सव निमित्त विविध ठिकामी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. काही ठिकाणी गेल्या चार दिवसापासून कार्यक्रम सुरू झाले असून त्यात पौराणिक इतिहासिक नाट्याप्रयोग, ऑर्केस्ट्रा आदी कार्यक्रम झाले









