महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त मंद्रुपमध्ये अभिवादन कार्यक्रम
by समीर शेख
अंत्रोळी : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या प्रारंभी मशाप्पा कोळी व वासुदेव नाटिकर यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष विजय कोळी, उपाध्यक्ष शिलसिद्ध कोळी, माजी अध्यक्ष तायप्पा कोळी, तसेच दादा कोळी, कौशीक कोळी, लव कोळी, महेश कोळी, सुरेश कोळी, अप्पु कोळी, बबलु बागवान, बशीर पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन मंदिर मंडळाच्या वतीने करण्यात आले असून कार्यक्रमाची सांगता उपस्थित मान्यवरांच्या जयघोषात करण्यात आली.








