महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी राज्यपालपदावरून पायउतार होण्याची ईच्छा व्यक्त केल्य़ानंतर महाराष्ट्रात राज्यपाल म्हणुन भाजप कोणाचे नाव जाहीर करणार याची चर्चा होत असतानाच निर्माण झाली होती. पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे महाराष्ट्राचे पुढील राज्यपाल म्हणुन नाव पुढे येत आहे. याआधी भाजपच्या नेत्या सुमित्रा महाजन या कोश्यारी नंतर राज्यपाल असतील, असा दावा केला जात होता. मात्र, या शर्यतीतून त्यांचे नाव मागे पडले आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी 23 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यामध्ये आपली राजकीय जबाबदारीतून पायउतार होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर राजभवनाने काढलेल्या निवेदनात, राज्यपाल कोश्यारी यांनी आपले उर्वरित आयुष्य वाचन, लेखन आणि इतर विश्रांतीच्या कार्यात घालवण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे जाहीर केले होते.
दरम्यान, मार्च 2022 मध्ये झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी पदावरून काढून बाजूला केलेले पुर्वाश्रमीचे कॉंग्रेस नेते सिंग यांनी ऑक्टोबर 2021 रोजी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर पुढील वर्षी त्यांनी स्वतःची पंजाब लोक काँग्रेसची राजकीय संघटना स्थापन केली. तथापि, पंजाब विधानसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष एकही जागा जिंकू शकला नसल्याने त्यांचा पक्ष भारतीय जनता पक्षात विलीन झाला.
Previous Articleप्रादेशिक पक्षच लोकशाही टिकवून ठेऊ शकतात
Next Article तिरंग्याच्या साक्षीने फुटबॉलमध्ये एकजुटीचा निर्धार








