वृत्तसंस्था / नवी मुंबई
2024 च्या विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतील शनिवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात महाराष्ट्राने हिमाचल प्रदेशचा 84 धावांनी पराभव केला. शानदार दीडशतक झळकविणाऱ्या महाराष्ट्राच्या सिद्धेश वीरला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात हिमाचल प्रदेशने नाणेफेक जिंकून महाराष्ट्राला प्रथम फलंदाजी दिली. महाराष्ट्राचा डाव 50 षटकात 360 धावांत आटोपला. त्यानंतर हिमाचलप्रदेशने 48 षटकात सर्वबाद 276 धावा जमविल्या.
महाराष्ट्राच्या डावात सिद्धेश वीर आणि अंकित बावने यांनी दमदार शतके झळकविताना तिसऱ्या गड्यासाठी 253 धावांची द्विशतकी भागिदारी केली. वीरने 119 चेंडूत 8 षटकार आणि 15 चौकारांसह 155 तर बावनेने 199 चेंडूत 3 षटकार आणि 12 चौकारांसह 123 धावा जमविल्या. काझीने 2 षटकार आणि 2 चौकारांसह 28 धावा केल्या. हिमाचलप्रदेशतर्फे वैभव अरोराने 43 धावांत 5 तर ऋषी धवनने 83 धावांत 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना हिमाचलप्रदेशच्या डावात प्रशांत चोप्राने 90 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह 87, मणी शर्माने 52 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह 54, वालियाने 43 चेंडूत 3 षटकार 3 चौकारांसह 45, वैभव अरोराने 24 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 28 धावा जमविल्या. महाराष्ट्रातर्फे काझीने 71 धावांत 3, बचावने 5 धावांत 2 तसेच प्रदीप दधे, सिद्धेश वीर आणि गुरबानी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : महाराष्ट्र 50 षटकात सर्वबाद 360 (सिद्धेश वीर 155, अंकित बावने 123, काझी 28, वैभव अरोरा 5-43, धवन 3-83), हिमाचलप्रदेश 48 षटकात सर्वबाद 276 (प्रशांत चोप्रा 87, मणी शर्मा 54, वािलया 45, धवन 20, अरोरा 28, काझी 3-71, बचाव 2-55, गुरबानी, दधे, वीर प्रत्येकी 1 बळी)









