पुणे / प्रतिनिधी :
राज्याचा ‘पंचामृत अर्थसंकल्प’ भरकटलेल्या व ठप्प झालेल्या विकासाला पुन्हा योग्य दिशेला आणून चालना देणारा आहे. या अर्थसंकल्पातील विविध तरतुदी व प्रस्तावित योजना महाराष्ट्राला पुन्हा देशात अव्वल स्थानावर नेतील, असा विश्वास महाराष्ट्र भाजपाचे उपाध्यक्ष माधव भांडारी (Madhav Bhandari) यांनी सोमवारी येथे व्यक्त केला.
अर्थसंकल्पामुळे पुणे व पश्चिम महाराष्ट्राला मिळालेल्या लाभाची माहिती देण्यासाठी पुणे भाजपाच्या कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भांडारी म्हणाले, राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच जनभागीदारीतून अर्थसंकल्प सादर केला गेला, हे या अर्थसंकल्पाचे सर्वात मोठे व महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे. 40 हजार नागरिकांनी पाठवलेल्या सूचना विचारात घेऊन, त्यांच्या साह्याने तयार केलेला हा अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने लोकांना हवा असलेला अर्थसंकल्प ठरला आहे. विशेषत: प. महाराष्ट्र व कोकणातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी लागू केलेली काजू फळ विकास योजना क्रांती घडविणारी आहे. लेक लाडकी योजनेतून मुलीला 18 वर्ष झाल्यावर 75 हजार रुपये, महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत पाच लाखांपर्यंत विमा संरक्षण, इतर मागासवर्गीयांसाठी 10 लाख घरांची मोदी आवास घरकुल योजना, आपला दवाखाना आदी योजना शोषित वंचित घटकांचे जीवनमान कायमस्वरूपी बदलून टाकणाऱ्या योजना आहेत. प. महाराष्ट्राच्या विकासाला यातून चालना मिळेल.
अधिक वाचा : पुणे विमानतळावर महिला इन्स्पेक्टरला मारहाण; तरुणी गजाआड








