वृत्तसंस्था/ पुणे
विजय हजारे करंडक स्पर्धेसाठी पहिल्या दोन सामन्यांकरिता महाराष्ट्र संघाची घोषणा करण्यात आली असून ऋतुराज गायकवाडकडे नेतृत्व कायम ठेवण्यात आले आहे.
महाराष्ट्रने बुधवारी 16 सदस्यीय संघ जाहीर केला असून पहिले दोन सामने 21 व 23 डिसेंबर रोजी मुंबईत खेळविले जाणार आहेत. इलाईट ब गटातील हे सामने राजस्थान व सेनादलविरुद्ध होतील. गेल्या मोसमात महाराष्ट्र संघाचे आव्हान प्राथमिक उपांत्यपूर्व फेरीतच केरळने संपुष्टात आणले होते.
महाराष्ट्र संघ : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), ओम भोसले, सिद्धेश वीर, अंकीत बावणे, राहुल त्रिपाठी, अझिम काझी, निखिल नाईक, धनराज शिंदे, हितेश वळुंज, राजवर्धन हंगरगेकर, मुकेश चौधरी, रजनीश गुरबानी, प्रदीप दाढे, सत्यजीत बच्छाव, दिव्यांग हिंगणेकर, प्रशांत सोळंकी.









