नाशिकच्या आकाश शिंदेकडे महाराष्ट्र संघाचे नेतृत्व
वृत्तसंस्था/ मुंबई
ओडिसा येथे होणाऱ्या 71 व्या पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राने आज आपला पुरुष संघ जाहीर केला. ओडिसा, कटक येथील जे. एन. बंदिस्त क्रीडा संकुल येथे दि. 20 ते 23 फेब्रु. या कालावधीत ही स्पर्धा खेळविण्यात येईल. नाशिकच्या आकाश शिंदेकडे पुन्हा एकदा या संघाच्या नेतृत्वाची धुरा देण्यात आली आहे. गतवर्षी अहमदनगर, महाराष्ट्र येथे झालेल्या 70 व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष संघाने उपांत्य फेरीत धडक देत तृतीय क्रमांक मिळविला होता. निवडण्यात आलेला हा संघ 19 फेब्रु.रोजी पहाटे स्पर्धेकरिता कटक येथे रवाना होईल.
पुरुष संघ – 1) आकाश शिंदे – संघनायक, 2) आकाश रूडले, 3) शंकर गदई, 4) तेजस पाटील, 5) संकेत सावंत, 6) अक्षय सूर्यवंशी, 7) मयूर कदम, 8) शिवम पठारे, 9) प्रणय राणे, 10) अजित चौहान, 11) कृषिकेश भोजने, 12) संभाजी वाबळे.









