धरणांमध्ये 32 टक्केच पाणी, गतवर्षीपेक्षा 27 टक्के जलसाठा कमी, पावसाची प्रतीक्षा
पुणे / प्रतिनिधी :
राज्यात पावसाने ओढ दिल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी म्हणजेच 32 टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा सध्या धरणांमध्ये शिल्लक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. राज्यात पुन्हा पावसास सुरुवात झाली असून, पुढील चार ते पाच दिवस राज्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे हा पाणीसाठा वाढून पाणीसंकट दूर होण्याची अपेक्षा आहे.
जूनच्या शेवटच्या आठवडय़ात तसेच जुलैच्या सुरुवातीला राज्यभर चांगलाच दमदार पाऊस झाला. यामुळे राज्यभरातील सर्व धरणांत पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली. मात्र, मध्यंतरी पुन्हा पावसाने ओढ दिल्याने या पाणीसाठय़ात म्हणावी तशी वाढ झालेली नाही. गेल्यावर्षी 17 जुलैपर्यंत राज्यात 59 टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. यंदा मात्र पावसाअभावी हा साठा 32.23 टक्के आहे. यात सर्व धरणांत मिळून नागपूर विभागात 49, अमरावती 42.89, औरंगाबाद 24.82, नाशिक 31.90, पुणे 22.49, कोकणात 56.65 इतका पाणीसाठा आहे.
राज्यातील मोठय़ा धरणांमध्ये मर्यादितच पाणी
राज्यातील बहुतांश धरणे जुलैच्या आसपास अर्ध्यापेक्षा अधिक भरलेली असतात. यंदा मात्र, अनेक महत्त्वाच्या धरणांतील पाणीसाठा मर्यादित असल्याचे दिसत आहे. कोयना, उजनी, गोसी खुर्द, जायकवाडीसह राज्यातील मोठय़ा व महत्त्वपूर्ण धरणांना पावसाची प्रतीक्षा आहे.
राज्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा पुढीलप्रमाणे
अमरावती विभाग
काटेपूर्णा 25.92, वाण 33.55, अप्पर वर्धा 58.66, नळगंगा 26.08, खडकपूर्णा 0, पेनटाकळी 43.65, बेंबळा 45.32, इसापूर 44.97, अरुणावती 35.39, पूस 47.25.
औरंगाबाद विभाग
पैठण 27.48, मांजरा 22.86, माजलगाव 15.96, येलदरी 59.48, सिद्धेश्वर 0, निम्न मनार 32.60, निम्न तेरणा 27.60, सिना कोळेगाव 0.
कोकण विभाग
धामणी 49.15, कवडा उ. बंधारा 111.85, तिल्लारी 44.93, निम्न चौंडे 59.34, भातसा 43.08, ऊर्ध्व घाटघर 41.05, तानसा 69, मोडकसागर 68.
नागपूर विभाग
गोसीखुर्द 39.98, बावनथडी 19.28, असोळामेंढा 99.37, दिना 82.02, सिरपूर 40.24, इटियाडोह 54.81, पुजारीटोला उ. बंधारा 75.76, कालीसरार 61.79, खिडसी 66.25, वडगाव 37.35, नांद 17.64, कामठी खैरी 68.21, निम्न वर्धा 51.14, बोर 36.70,
नाशिक विभाग
निळवंडे 2- 29.81, भंडारदरा 66.83, मुळा 28.10, मुसळवाडी तलाव 36.57, वाघुर 55.81, ऊर्ध्व तापी हतनूर 33.65, कडवा 28.67, वाकी धरण 9.85, अर्जुनसागर 46.83, मुकणे 51.93, भाम धरण 31.24, चणकापूर 28.51, गिरणा 19.26, पालखेड 33.69, वैतरणा 38, वाघाड 16.26, भावली 64.72, दारणा 60.33, तिसगाव 0.0, ओझरखेड 24.87, करंजवण 23.52, गंगापूर 40.22, पुणेगाव 17.87.
पुणे विभागासही पावसाची प्रतीक्षा
तुळशी 23.52, राधानगरी 43.03, तिल्लारी 18.21, दुधगंगा 13.79, भामा आसखेड 33.86, डिंभे 14.18, चासकमान 23.86, येडगाव 27.85, घोड 0, पिंपळगाव जोगे 0, माणिकडोह 12.52, वडज 16.49, गुंजवणी 24.86, नीरा देवघर 30.32, भाटघर 27.10, पानशेत 31.23, वरसगाव 31.09 खडकवासला 45.72, पवना 29.36, टेमघर 17.96, वारणा 31.87, धोम 26.71, उरमोडी 33.92, तारळी 55.91, धोम बलकवडी 46.93, कन्हेर 21.32, कोयना 19.20, वीर 22.29, उजनी 0 टक्के पाणीसाठा








