ऑनलाईन टीम/तरुण भारत
Shashikant Ghorpade dead body found: बेपत्ता असलेले महाराष्ट्र राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत पतंगराव घोरपडे (Shashikant Ghorpade) यांचा मृतदेह नीरा नदीपात्रात (Nera River) सापडला. त्यामुळं खळबळ उडाली आहे. बुधवारी दुपारनंतर अचानक बेपत्ता झाले होते. त्यांनतर आज शोध मोहिमेदरम्यान सकाळी त्यांचा नीरा नदीपात्रात मृतदेह सापडला आहे.
दरम्यान, शशिकांत घोरपडे १२ ऑक्टोबरपासून बेपत्ता होते. त्यांच्या नातेवाईकांनी शिरवळ (ता खंडाळा) पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी युद्धपातळीवर शशिकांत यांची शोध मोहीम सुरु केली होती. शोध मोहिमेदरम्यान आज सकाळी त्यांचा मृतहेह नीरा नदीपात्रात आढळून आला. सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे कालपासून नीरा नदीच्या पात्रात घोरपडे यांचा शोध सुरू होता. घोरपडे यांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफचे पथकही पोहोचले होते. त्याआधीच नीरा नदीच्या पुलाच्या भिंतीलगत त्यांचा मृतदेह सापडला आहे. त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

हे ही वाचा : आमदार संतोष बांगरांचा पीकविमा कार्यालयात राडा; अधिकाऱ्यांनाही केली शिवीगाळ
मूळचे सातारा (Satara) जिल्ह्यातील असलेले शशिकांत घोरपडे पुण्यात कार्यरत होते. बुधवारी दुपारी ते पुण्याहून साताऱ्याच्या दिशेनं निघाले होते, मात्र ते घरी पोहोचलेच नाहीत. त्यामुळं कुटुंबीयांनी शिरवळ पोलिसांमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर शोधाशोध सुरू झाली असता सीसीटीव्ही फूटेजमधून काही गोष्टी समोर आल्या. पुण्यातून पुढे आल्यावर सारोळा गावाजवळ त्यांनी गाडी उभी केली. तिथून पुढं पायी चालत ते नीरा नदीच्या दिशेनं गेलेले कॅमेऱ्यात दिसले होते. त्या आधारे शोध घेतला जात होता.








