महाराष्ट्रात रस्ते अपघातांमध्ये एकूण 15, 224 लोकांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर येत आहे. एकूण 33,383 रस्ते अपघातमधील हि मृत्युची आकडेवारी समोर येत आहे. 2021 च्या तुलनेत 13% वाढ असून दुचाकी आणि तीन चाकी वाहनांच्या अपघातांमधील मृत्युंची संख्या 54 टक्क्यांवर आहे. हे सर्व अपघात वाहन वेगाने चालवण्यामुळे, मद्यपानकरून वाहन चालवल्यामुळे तसेच हेल्मेट आणि सीटबेल्टचा वापर न केल्याने झाली आहेत. याशिवाय, बहुतांश मृत्यू संध्याकाळी 6 ते रात्री 9 च्या दरम्यान झाले आहेत. या संदर्भातील माहिती महाराष्ट्र महामार्ग वाहतूक पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालात दिली आहे.
गेल्या वर्षी राज्यातील 33,383 रस्ते अपघात घडून आले. त्यामध्ये एकूण 15,224 लोकांचा मृत्यू झाला आहे. 2021 मध्ये नोंदलेल्या 13, 538 अपघातांच्या मृत्यूंमध्ये तुलनेत 13%नी वाढ झाली असल्याचे अहवालात म्हटले आहे.
2018 पासून गेल्या पाच वर्षामध्ये मृत्युच्या आकडेवारीत या वर्षी सर्वात जास्त आकडा आहे. 2022 मध्ये मृत्यु झालेल्या वाहन धारकांपैकी 54% लोकांचा मृत्यु दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या अपघातामध्ये झाला आहे. त्यानंतर 19% पादचारी किंवा रस्त्यावर चालणाऱ्या लोकांचा मृत्यु झाला आहे. तर 27, 239 लोकांना गंभिर दुखापत झाली आहे.
३३,३८३ अपघातांपैकी ९, ४१८ राष्ट्रीय महामार्गांवर तर ६, ९०२ अपघातांची नोंद राज्य महामार्गांवर झाली आहे. महामार्ग वाहतूक पोलिसांच्या मते, राज्यातील 10 प्रमुख जिल्ह्यांमध्ये 41% मृत्यू झाले आहेत. त्यापैकी पुणे ग्रामीण (९२३), नाशिक ग्रामीण (९१२), अहमदनगर (८४१), सोलापूर ग्रामीण (६४१), जळगाव (५५२), सातारा (५३४), नागपूर ग्रामीण (४९२), बीड (४६२), औरंगाबाद ग्रामीण (४५७). ) आणि चंद्रपूर (434).
2021 च्या आकडेवारीच्या तुलनेत वाढ झालेल्या जिल्ह्यामुध्ये रत्नागिरीमध्ये 44%, त्यानंतर बुलढाण्यात 39% आणि औरंगाबादमध्ये 29% मृत्यूची नोंद झाली आहे.