Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis)सर्वोच्च न्यायालयात काल सुनावणी पार पडली. आज (गुरुवारी) पुन्हा सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी सुरू झाली आहे. कोर्ट आज काय निर्णय देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी,राजीव धवन, देवदत्त कामत तर शिंदे गटाकडून हरीश साळवे, नीरज किशन कौल, मुकुल रोहतगी, महेश जेठमलानी कोर्टात बाजू मांडणार आहेत.
कोर्टात या प्रश्नांची उत्तरं मिळणार?
-आमदार अपात्रतेच्या मुद्यावर न्यायालय निर्णय देणार?
-आमदार अपात्रतेवर कोर्ट निर्णय देणार की विधानसभा अध्यक्षांवर निर्णय सोपवणार?
-शिवसेना कोणाची याचा फैसला होणार?
-पक्षांतर बंदी कायद्याबाबत न्यायालय काय निर्णय देणार?
-शिंदे गटाकडून पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन झालं की नाही?
-शिंदे सरकारची नियुक्ती वैध की अवैध?
-शिंदे गटानं केलेल्या नियुक्त्यांबाबत कोर्ट काय निर्णय देणार?
-निवडणूक आयोगानं पाठवलेल्या नोटिशीला कोर्टात स्थगिती मिळणार?
Previous Articleखानापूरला ता.पं.कार्यनिर्वाहक अधिकारी नेमा
Next Article स्वच्छता निविदेचा निर्णय जिल्हाधिकाऱयांकडे








