गेली काही दिवस सुरु असलेल्या सत्तानाट्याला अखेर विराम मिळाला आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांची निवड झाली आहे. यामुळे भाजपच्या गळ्यात आता आणखी एक माळ पडली. आज सकाळी विधिमंडळात महाराष्ट्राला तरुण अध्यपद मिळाले म्हणून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. भाजप आणि शिवसेनेच्या बंडखोर अशा एकूण १६४ आमदारांनी मतदान करत त्यांना बहुमतांनी विजयी केले. तर यात महाविकास आघाडीच्या राजन साळवी यांचा पराभूत झाला. यावेळी साळवी यांना १०७ मतं मिळाली. भाजपानं विधानसभा अध्यक्षपदासाठी नार्वेकरांचे नावं जाहीर केल्यानंतर मात्र राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. भाजपात अनेक दिग्गज नेते असताना यांचं नावं कसं समोर आलं. अनेकांना प्रश्न पडला असेल नेमके कोण आहेत. कारण त्यांचा राजकीय प्रवास हा सेनेतून सुरु झाला होता. मग ते भाजपाचे विधिमंळाचे अध्यक्ष कसे काय? नेमके ते आहेत तरी कोण हे जाणून घेऊया. (Maharashtra Assembly New Speaker)
राहुल नार्वेकर कोण आहेत.
विधिमंडळाचे नवे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा जन्म दक्षिण मुंबईतील कुलाबा येथे झाला. तरुण वयातच ते राजकारणात आले. त्यांचे भाऊ मकरंद नार्वेकर कुलाब्यातील नगरसेवक आहेत. राहुल नार्वेकर हे पेशाने वकिल आहेत. मुंबई महापालिका तसंच इतर विषयांच्या संदर्भात दाखल याचिकेवर शिवसेनेची बाजू मांडण्याचं काम राहुल नार्वेकर करत होते. अनेक संस्थांचे कायदेशीर सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. तसेच शैक्षणिक, सामाजिक आणि सहकारी संस्थांसाठी वकील म्हणून बाजू मांडण्याचं काम केलं.
लोकसभा निवडणुकीत पराभूत
राहुल नार्वेकर यांनी 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसकडून मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. पण 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना विधान परिषदेवर पाठवलं.
भाजपकडून विधानसभेत कसे गेले
2019 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी भाजपतर्फे कुलाबा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. शिवाय भाजपकडून त्यांना मीडिया इंचार्ज पदाची जबाबदारीही देण्यात आली होती. अशा प्रकारे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसनंतर भाजपमध्ये ते स्थिरावले आहेत.
राजकीय पार्श्वभूमी -सासरे-जावई सभापती
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर यांचे ते जावई आहेत. नाईक हे सध्या महाराष्ट्र विधान परिषदेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. तर आज राहुल नार्वेकर यांची नवे अध्यक्ष म्हणून निवड झाली. नियुक्तीनंतर विधिमंडळात जावई- सासऱ्य़ाचे वर्चस्व असल्याचे जवळजवळ सर्वंच मंत्र्यांनी म्हटले. तर त्य़ांच्या कुटुंबाचेही अभिनंदन केले. तसेच नार्वेकर यांच्या कामाची पध्दत, सगळ्यांना जवळ करण्याच्या कौशल्याचे आज कौतुक करण्यात आले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









