उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा आणि धक्कादायक खुलासा
ऑनलाईन टीम/तरुण भारत
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : “मी राजकारणातला चाणक्य नाही. परंतु राज्यात जे काही घडलंय त्यात माझी भूमिका होती. याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे या सगळ्या राजकीय घडामोडीत आमच्या पाठिशी खंबीरपणे उभे होते. मोदींचा राज्यातील सत्ताबदलाच्या रणनितीत सहभाग नव्हता, परंतु त्यांचा आम्हाला आशिर्वाद होता”, असा धक्कादायक खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना केला आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे (Eknath Shunde) यांनी शिवसेनेत बंड करत ४० आमदारांना घेऊन भाजपसोबत सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. त्यामुळे मविआ सरकार पडल्यानंतर आता राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. यांनतर सरकारच्या मंत्रिमंडळाचाही विस्तार झालेला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड का केलं किंवा त्यामागे काय कारणं होती, त्यांनी विधानसभेत केलेल्या भाषणात सविस्तरपणे सांगितलं होतं. परंतु या सगळ्या राजकीय घडामोडींवर भाजपच्या कुठल्याही नेत्यांनं भाष्य केलेलं नव्हतं. परंतु आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात जे काही घडलंय त्यात माझी भूमिका होती असं म्हणत मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्त दिलेल्या मुलाखतीत राज्यातील सत्तासंघर्षावर भाष्य केलं आहे. त्यात बोलताना ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार कोसळणं आणि राज्यात सत्ताबदल होणं हे भाजपनं उद्धव ठाकरेंना दिलेलं उत्तर आहे. त्यांनी आमच्या पाठिंत खंजीर खुपसला होता. त्यामुळं आता त्यांना आम्ही उत्तर दिलं, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे.