Mumbai Police : ठाकरे सरकारने काही कारणास्तव कॉन्स्टेबल दर्जाच्या अधिकाऱ्यांना खात्यातूनच मिळणारी कर्ज सेवा बंद केली होती. ती युती सरकारने पून्हा सुरु केली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडून महाराष्ट्र पोलिसांना गणपती उत्सवात मोठं गिफ्ट मिळालं आहे. डीजी कर्ज खात्यासाठी आवश्यक तेवढा निधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांनी विधानसभेत बी.डी.डी. चाळीच्या पुनर्विकासांतर्गत पोलिसांना १५ लाख रुपयांमध्ये मालकी हक्काची घरे देण्याची घोषणा केली होती. यानंतर तत्काळ अंमलबजावणी करण्यात आली.मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनंतर अवघ्या ५ दिवसात शासन निर्णय मंगळवारी गृहनिर्माण विभागाने जाहीर केला. त्यामुळे घराच्या प्रतिक्षेत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कर्ज सेवा सुरु केल्याने पोलिसांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होण्यास मदत होणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








