ऑनलाईन टीम/तरुण भारत
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सरकारी निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावर (Sagar Bungalow) सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सागर बंगल्यावर भाजप नेत्यांची एक बैठक बोलावली आहे. राज्यात सुरू असलेल्या घडामोडींवर ही बैठक असल्याचे बोलले जात आहे. शिंदे गट आणि भाजप मिळून सत्ता स्थापन करणार असल्याचे बोलले जात आहे.
फडणवीसांच्या सागर बंगल्यावर होणाऱ्या या बैठकीला भाजपाचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, सुधिर मुनगंटीवार यांच्यासह अनेक भाजपाच्या प्रमुख नेत्यांना बोलावण्यात आले आहे. त्यामुळे आता या बैठकीत काय चर्चा केली जाणार आणि सध्याच्या परिस्थितीबाबत काय निर्णय घेतले जातात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला (Delhi) जात आहेत. आजही फडणवीस हे दिल्लीला जाणार असल्याची माहिती मिळते. आज दुपारनंतर पुन्हा एकदा दिल्लीला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. फडणवीस यांची या आठवड्यातील ही चौथी दिल्ली वारी असणार आहे.








