Maharashtra Monsoon Session : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सभागृहात विनायक मेटे यांच्या अपघाताबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी विरोधीपक्षनेते अजित पावर यांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आठ पदरी करणं गरजेचं आहे. जाता येता मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे हा ४-४ लेनचा करा अशी मागणी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच डिजीटल सिस्टिम आणणार आहे. अपघात हावू नयेत म्हणून घेतलेला निर्णय चांगला आहे पण यासंदर्भात निर्णय लवकर व्हावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
यावेळी बोलताना ते म्हणाले, लहान वाहनांच्या वाहतुकीसाठी वेगळी मार्गिका हवी. यासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आठ पदरी करणं गरजेचं आहे. यामुळे भविष्यात असे अपघात टाळता येतील. मेटेंच्या अपघातासंदर्भात बोलताना ते म्हणाले, मेटेंचा ड्रायव्हर स्टेटमेंट सारखं बदलत असल्यानं घातपाताची शंका उपस्थित होत आहे. अपघातासंदर्भात पोलिस यंत्रणा तपास कसा करत आहे, सरकार नेमकी कोणती कारवाई करणार असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला. महाराष्ट्रात अशा अपघाताची पुर्नरावृत्ती होऊ नये यासाठी सरकारने योग्य ती यंत्रणा राबवावी तसेच यावर लवकर अंमलबजावणी करावी असेही ते म्हणाले.
मंत्री तेच, मात्र अडीच वर्षांत निर्णय का बदलला? शिंदेंचा पूर्वी विरोध होता मग आता निर्णयात का बदल केला. असा प्रश्न विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला. नगरविकास खात्यानं बदललेल्या निर्णयावर सभागृहात चर्चा करण्यात आली आहे. त्याशिवाय थेट सरपंच, नगराध्यक्ष निवडणुकूच्या विधेयकावर सभागृहात चर्चा करण्यात आली. लोकशाही पध्दतीनं कामकाज व्हावं असेही मत मांडण्यात आलं.
Previous Articleराऊतांचा कोठडीतला मुक्काम वाढला
Next Article करवीर तालुका विभाजनाची कार्यवाही करा








