रत्नागिरी :
सरकारच्या मँगोनेट या प्रणालीद्वारे देशातील निर्यातक्षम आंबा बागांच्या नोंदणीत देशात महाराष्ट्र राज्य अव्वल ठरले आहे. त्यामध्ये 17 हजार 691 शेतकरी हे केवळ महाराष्ट्रातील आहेत. त्यातील 6 हजार 996 शेतकरी हे केवळ रत्नागिरी जिह्यातील असल्याची माहिती आहे. राज्यातील 14 जिह्यातून एकूण 17 हजार 691 बागा नोंद करण्यात आल्या असून त्यातील सर्वांत जास्त बागा या रत्नागिरी जिह्यातील 6,996 इतक्या नोंद झाल्या आहेत.
अलिकडे आंबा निर्यातीसाठी शासन स्तरावरून बागायतदार शेतकऱ्यांना मँगोनेट प्रणाली नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. त्यानुसार बागायतदार या प्रणालीत आपल्या बागांची नोंदणी करण्यास मोठा प्रतिसाद देताना दिसत आहेत. सरकारच्या मँगोनेट प्रणालीद्वारे देशातील निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यामध्ये देशात महाराष्ट्र राज्य अव्वल ठरले आहे. यामुळे निश्चितच देशातील सर्वात जास्त आंबा उत्पादन आणि निर्यात ही महाराष्ट्र राज्यातून होणार आहे.
कृषी विभागाच्या माहितीनुसार, देशात एकूण 23 हजार 157 शेतकऱ्यांनी निर्यातक्षम बागांची नोंदणी केली आहे. पण त्यातील 17 हजार 691 शेतकरी हे केवळ महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे निर्यातीसाठी 76 टक्के शेतकरी हे महाराष्ट्रातील आहेत. विशेष म्हणजे त्यातील 6 हजार 996 शेतकरी हे केवळ रत्नागिरी जिह्यातील असल्याची माहिती देण्यात आली आहे.
- भारतातील राज्यनिहाय बागायतदारांची नोंदणी :
आंध्रप्रदेश – 2014, बिहार – 175, गोवा – 2, गुजरात -1308, कर्नाटक – 259, तामिळनाडू -159, तेलंगणा -1280, उत्तरप्रदेश -269, महाराष्ट्र – 17 हजार 691.
- महाराष्ट्रातील जिल्हानिहाय मँगोनेटसाठीची नोंदणी:
अहिल्यानगर -488, बीड – 22, गोंदिया -23, नाशिक – 627, धाराशिव – 1363, पालघर -206, पुणे – 819, रायगड – 2176, रत्नागिरी -6996, सांगली -428, सातारा -100, सिंधुदुर्ग – 1739, सोलापूर -1201, ठाणे – 1376.








