ऑनलाईन टीम/तरुण भारत
महाराष्ट्र आणि कर्नाटक (Maharashtra and Karnataka) या दोन राज्यातील सीमावर्ती जिल्ह्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी या दोन राज्यांच्या राज्यपालांच्या उपस्थितीत आज कोल्हापुरात ‘आंतरराज्य समन्वय’ बैठक आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bbhagat Singh Koshyari) आणि कर्नाटक राज्याचे राज्यपाल थावरचंद गेहलोत (Thawar Chand Gehlot) यांच्या उपस्थितीत रेसिडन्सी क्लबमध्ये या बैठकीला सुरवात झाली आहे.
दरम्यान, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूरचे जिल्हाधिकारी उपस्थित आहेत. दुसरीकडे सीमाभागातील बेळगाव, विजयपुरा, कलबुर्गी, आणि बिदरचे जिल्हाधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत. यावेळी महाराष्ट्र सीमावाद, अलमट्टी धरण वाद तसेच सीमाभागात भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.