Maharashtra Karnataka Border Dispute : महाविकास आघाडीचे प्रमुख नेते व कार्यकर्ते एकीकरण समितीच्या मेळाव्यासाठी माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली आज हजारो कार्यकर्ते बेळगावच्या दिशेने जात असताना कर्नाटक पोलीसांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना कर्नाटक सीमेवर रोखले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाली. यानंतर महाराष्ट्र पोलीसांनी हसन मुश्रीफ आणि कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली, आणि काही वेळाने त्यांना सोडून देण्यात आले. यावेळी नेमके काय घडले जाणून घेवूया या छायाचित्रणाच्या माध्यमातून…














