प्रतिनिधी/ बेळगाव
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची महत्त्वाची बैठक रविवार दि. 29 रोजी आयोजित केली आहे. सायं. 4.30 वा. टिळकवाडी येथील युवा समितीच्या कार्यालयात बैठक होणार आहे. या बैठकीवेळी जानेवारी महिन्यात होणाऱ्या सामान्यज्ञान स्पर्धेच्या नियोजनासंदर्भात चर्चा होणार आहे. सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी केले आहे.









