ऑनलाईन टीम/तरुण भारत
संभाजीराजे छत्रपती (sambhajiraje chhatrapati) यांनी काही दिवसांपूर्वी स्वराज्य संघटनेची (swarajya sanghatana) घोषणा केली होती. महाराष्ट्रातील विस्थापित मावळ्यांना संघटित करुन स्वराज्य आणण्यासाठी या संघटनेची स्थापना केली आहे. परंतु या संघटनेचे बोधचिन्ह काय असणार याबाबतची माहिती संभाजीराजे यांनी दिली नव्हती. आज संभाजीराजे छत्रपती यांनी स्वराज्य संघटनेचे बोधचिन्ह सर्वांच्या कल्पनेतून साकारण्यात यावे अशी भूमिका संभाजीराजे छत्रपती यांनी मांडली आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून समर्थकांना संघटनेसाठी कल्पक असे बोधचिन्ह पाठवण्यास सांगितले आहे.
माजी राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुक पोस्टद्वारे राज्यातील जनतेला आवाहन केलं आहे. स्वराज्य संघटनेचे बोधचिन्ह सर्वांच्या संकल्पनेतून साकारणार असल्याचे संभाजीराजेंनी सांगितले. विस्थापित मावळ्यांना संघटीत करून जनतेच्या मनातलं ‘स्वराज्य’ आणण्यासाठी “स्वराज्य” संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेचे अधिकृत बोधचिन्ह ( लोगो ) जनतेच्याच संकल्पनेतून साकारावे अशी माझी इच्छा असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.
“स्वराज्य चे बोधचिन्ह सर्वांच्या कल्पनेतून साकारावे… विस्थापित मावळ्यांना संघटित करून जनतेच्या मनातलं ‘स्वराज्य’ आणण्यासाठी “स्वराज्य” संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. रम्यान हे बोधचिन्ह सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधित्व करणारे असे स्वराज्य संघटनेची ओळख असेल. तरी, कल्पक मंडळींना आमचे आवाहन आहे की, असे बोधचिन्ह तयार करून खाली दिलेल्या व्हॉट्स ॲप नंबर वरती पाठवून द्यावे. ज्यांनी तयार केलेले बोधचिन्ह ‘स्वराज्य’चे अधिकृत बोधचिन्ह म्हणून स्वीकारले जाईल, त्यांस छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते मानपत्र व मानचिन्ह देऊन सन्मानित केले जाईल,” असे संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.