कोडोलीत दिव्यांग शेतकरी कामगार मेळाव्याला
वारणानगर / प्रतिनिधी
दिव्यागासाठी मंत्रालय निर्माण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असून दिव्यांगासाठी घरकुल देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे दिव्यांग मंत्रालयाचे राज्यमंत्री बच्चू उर्फ ओमप्रकाश कडू यानी केले.
कोडोली ता. पन्हाळा येथील निर्माण सामाजिक बहुउद्देशीय सेवा संस्थेने आयोजीत केलेल्या दिव्यांग शेतकरी कामगार मेळाव्यात प्रमुख पाहूणे म्हणून राज्यमंत्री बच्चू कडू बोलत होते. निर्माण सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष जयदीप पाटील यानी ना. कडू यांचा सत्कार व स्वागत करून संस्था राबवत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली.
बर्लिन येथील विशेष ऑलम्पिक स्पर्धेत २५ मिटर फ्री स्टाईल जलतरण स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलेल्या दीक्षा शिरगावकर, सेट परिक्षा उत्तीर्ण झालेल्या ओंकार पाटील,मंत्रालय महसूल सहाय्यक रोहिणी कुलकर्णी,अमृता गोरड,श्रीधर पाटील,संदीप कुंभार,मुंबई पोलीस स्वाती पाटील,अनिकेत घाटगे या यशवंताचा ना.बच्चू कडू यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
सत्कार मूर्तीनी शासन सेवेने स्वत्ता चे व गावाचे नाव उज्वल करावे आम्ही सरकार बदलात बाहेर पडलो खोके घेतलेसह अनेक प्रकारच्या बदनामीला सामोरे गेलो आम्हाला त्याची पर्वा नाही मी दिव्यांगाच्या हितासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलो एका शब्दावर त्यानी विव्यांग मंत्रालयाची स्थापना झाली गेली तीस वर्ष लाठ्या काठ्या खाऊन आंदोलनाने झाले नाही ते गट बदलल्याने झाले त्यामुळे मला कोणाच्याही टिकेची पर्वा नाही असे बच्चू कडू यानी सांगीतले. अल्पसंख्याक, मागासवर्गीय यांच्या विकासासाठी महामंडळे स्थापन झाली यांच्या पेक्षाही दिव्यांगाची संख्या जास्त असून देखील स्वतंत्र महामंडळ अथवा मंत्रालय नव्हते ते या सरकारने केले असून नवीन मंत्रालयामुळे दिव्यांगाचे प्रश्न लवकर मार्गी लागून सेवा सुविधा वाढणार असल्याचे बच्चू कडू यानी सांगीतले.