ऑनलाईन टीम/तरुण भारत

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गोव्याहून मुंबईत दाखल झाले आहेत. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी भाजप नेते उपस्थित होते. शिंदेंसोबत सोबत भाजप आमदार प्रसाद लाड, रवींद्र चव्हाण आहेत. एकनाथ शिंदे विमानतळाहून थेट देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवास्थानाकडे रवाना झाले आहेत. अशातच फडणवीस आणि शिंदे आजच मुंख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. आज सायंकाळी ७ वाजता राजभवनात शपथविधी होणार आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

दरम्यान, एकनाथ शिंदे हे फडणवीसांना भेटण्यासाठी सागर बंगल्यावर आले आहेत. शिंदे फडणवीसांना भेटल्यानंतर राज्यपालांना भेटण्यासाठी ते राजभवणार जाणार आहेत. यावेळी ते सत्ता स्थापनेचा दावा करणार असेल असं बोललं जात आहे. तसेच फडणवीस आणि शिंदे हे आजच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
एकनाथ शिंदे सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. यावेळी सागर बंगल्याबाहेर युवा सेनेचे आणि एकनाथ शिंदे यांचे समर्थक उपस्थित होते. यावेळी युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. गोंधळ घालणाऱ्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
सागर बंगल्यावरी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक संपली आहे. १५ मिनिटे शिंदे आणि फडणवीसांमध्ये चर्चा झाली. चर्चेनंतर शिंदे, फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि भाजपचे अन्य नेते हे राज्यपालाची भेट घेण्यासाठी राजभवनाकडे रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे शिंदे, फडणवीस आणि पाटील हे एकाच गाडीतून राज्यपालांना भेटण्यासाठी जात आहेत.








