गिरणी कामगार हा मुंबईचा कणा आहे, मात्र मिल बंद पडल्यामुळे यांना हलाखीच्या दिवसांना सामोरे जावे लागते. आज मी स्वतः मील कामगाराचा मुलगा असल्यामुळे यांची व्यथा जाणतो. माझ्या भागातील असंख्य मिल कामगारांना आपल्या हक्कासाठी लढावे लागत आहेत. त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच मील कामगारांच्या प्रश्नाची जाण असलेला आमदार विधान भवनात असलाच पाहिजे असे सांगत, मिल कामगारांच्या प्रश्नासाठी सरकारला धारेवर धरण्याची जबाबदारी आपण स्वीकारून मी स्वतः मिल कामगारांच्या पाठीशी खंबीर उभा असल्याची ग्वाही, नेसरी येथे पार पडलेल्या गिरणी कामगारांच्या मेळाव्यात मानसिंग खोराटे यांनी दिली.
Previous Articleराष्ट्रीय हस्ताक्षर स्पर्धेत विहान चाळके द्वितीय
Next Article दोन जीएसटी अधिकारी लाचप्रकरणी अटकेत









