Karnataka Maharashtra Dispute : कर्नाटक सरकारच्या (Karnataka Government) दडपशाही विरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीनं (Maharashtra Ekikaran Samiti) आज (सोमवारी ता.26 ) ‘चलो कोल्हापूर’चा (Kolhapur) नारा दिला होता. या मोहिमेस बेळगावातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातून सुरुवात झाली. खानापूर आणि बेळगाव ग्रामीण भागातून मोठ्या संख्येनं मराठी भाषिक कोल्हापुरात दाखल झाले आहेत. यावेळी दसरा चौकात ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ च्या घोषणेने सारा परिसर दुमदुमून गेला. दसरा चौकातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाला आहे.आज जिल्हाधिकारी कार्यालसमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार आहे. कोल्हापुरातील सर्व पक्षीय नेते यामध्ये सहभागी झाले आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








