ऑनलाईन टीम/तरुण भारत
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे, ज्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Tevendra Fadnavis) यांच्याकडे देण्यात आली आहे. दरम्यान, भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने आज घोषणा केली असून राज्यातून फडणवीसांना स्थान देण्यात आलं आहे. दरम्यान, भाजपच्या संसदीय समितीत १५ बड्या नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना वगळण्यात आलं आहे.
दरम्यान, मोदी सरकारसमोर शेती, ग्रामीण विकास, जल संवर्धन आणि पाण्याचा योग्य वापर ही सर्वात मोठी आव्हाने आहेत. नीती आयोगाकडून यावर काम सुरु आहे. पण या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे, ज्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिली आहे.
हे ही वाचा : भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळाची यादी जाहीर; नितीन गडकरींना डावललं
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा (J P Nadda) यांनी आज पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची घोषणा केली. यामध्ये देशभरातील भाजपाच्या १५ बड्या नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. समितीच्या अध्यक्षपदी जे.पी.नड्डा यांचा समावेश करण्यात आला आहे. तर सदस्यपदी पीएम नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, बीएस येडियुरप्पा, सर्वानंद सोनोवाल, के. लक्ष्मण, इकबाल सिंह लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जटीया, भुपेंद्र यादव, देवेंद्र फडणवीस, ओम माथुर, श्रीमती वनथी श्रीनिवास यांचा समावेश आहे. तर बीएल संतोष हे सचिवपदी असणार आहेत.