राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) राष्ट्रीय कार्यकारिणीच्या गुरुवारी दिल्लीत झालेल्या बैठकीपूर्वी, राष्ट्रवादीच्या विद्यार्थी संघटनेने अजित पवार यांना ‘गद्दार’ संबोधून पक्ष कार्यालयाबाहेर पोस्टर लावल्याने दिल्लीत पोस्टर युद्ध सुरू झाले. येथील राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर पोस्टर लावण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये ‘बाहुबली : द बिगिनिंग’ या चित्रपटातील पाठीत तलवार खुपसल्याचा प्रसिद्ध सीन रंगवण्यात आला आहे.
राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातील फुटीनंतर त्याचे मोठी पडसाद राज्यभरात उमटले. अजित पवार आमल्या समर्थक आमदारांसह शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात राजकिय घडामोडींना उत आला. दिल्लींमध्येही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये याची प्रतिक्रिया उमटली असून राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर पोस्टर वॉर भडकले आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे दिल्लीमध्ये पोहोचण्याअगोदर कार्यालयाच्या दारात राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेने लावली आहेत. या पोस्टरवर बाहूबली य़ा चित्रपटातील कटप्पा हा बाहूबलीवर मागून वार करत असलेला सीन रंगवण्यात आला आहे. या चित्रात सरद पवार यांना बाहूबली तर अजित पवार यांना कटप्पा दाखवले आहे. या पोस्टर बाजीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले असून राजकिय वर्तृळात सद्या तो चर्चेचा विषय आहे.








