ऑनलाईन टीम/ तरुण भारत
मुंबई : ऑनलाईन अॅपद्वारे अनेकांची फसवणूक झाल्याच्या घटना आपण नियमित पाहतो. तसेच ऑनलाईन अॅपद्वारे होणाऱ्या अर्थिक व्यवहारामध्ये वाढ झाल्याची माहिती पोलिसांसमोर आली आहे. यामध्ये 13 बोगस अॅपची यादी हाती लागल्यानंतर महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुगल प्ले स्टोरला एक पत्र लिहले आहे. या पत्रात बोगस अॅप प्ले स्टोरमधून कढून टाका किंवा डिलीट करा अशी सूचना केली आहे.
मोबाईलचे इंटरनेट सुरु केले की आपल्याला धडाधड नोटीफिकेशन यायला लागतात. काय आहे ते पाहण्यासाठी आपण लगेच क्लिक करतो. यात बऱ्याचदा कर्ज (Loan App) देणारे मेसेज असतात. अनेक नागरीक यावर क्लिक करतात आणि आमिषाला बळी पडतात. यातुन अनेकांची फसवणूक होते. यातुन पैसे तर जातातच पण कुटुंबाला आणि ज्याची फसवणूक झाली त्याला मानसिक त्रासही सहन करावा लागतो.
महाराष्ट्र सायबर पोलिसांच्या हाती अशा अॅपची माहिती लागताच त्यांनी गुगुल प्ले स्टोरला एक पत्र लिहले. आतापर्यंत 1829 ऑनलाईन कर्ज फसवणुकीच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. याचा मागोवा घेत असताना पोलिसांना या १३ अॅप्सचा शोध लागला आहे. 18 अॅप सायबर पोलिसांच्या स्कॅनर खाली आले असून, त्या अॅप्स बाबत सायबर पोलिस गुगलला लवकरच पत्र लिहणार आहे. तसेच संबंधित 13 अॅप तुमच्या नियम व अटींची पुर्तता करत नसतील तर त्या अॅपना तुमच्या प्ले स्टोरमधून काढून टाका अथवा डिलीट करा अशी सूचनाही त्यांनी केली आहे.
अशापध्दतीने जर कोणाची ऑनलाईन फसवणूक झाली असेल तर त्यांनी 1930 या हेल्पलाइनवर काॅल करून तक्रार नोंदवू शकतात. ऑनलाईन तक्रार cybercrime.gov.in वर नोंदवण्याचे आवाहनही करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र सायबर पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे यांनी दिली.