Maharashtra Crisis : शिंदे-फडणवीस सरकारचं पावसाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच भाजपा नेते मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा नेता लवकरच तुरुंगात जाणार असल्याचा दावा केला. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी कंबोज विरोधात आक्रमक भूमिका घेतली. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही मोहित कंबोज यांच्यावर घणाघात केला आहे. मोहित कंबोज हा कोणाचा कार्यकर्ता, माणूस, कोणाच्या चड्डीचा नाडा आहे सर्वांना माहिती आहे, अशी टीका त्यांनी केलीय.
यावेळी बोलताना ते म्हणाले, मोहित कंबोज यांनीच भोंगे वाटले होते. ते भाजपाचे भोंगे आहेत. शेतकरी, जीसएटीच्या प्रश्नावर बोलताना ते दिसत नाहीत. हा कोण आहे मोहित कंबोज असा एकेरी उल्लेखही यावेळी त्यांनी केला. ईडीच्या दारात बसून त्यांनी ही माहिती मिळवली आहे का? असा प्रश्न उपस्थित करत मोहित कंबोजची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही केली. ईडी कोणाच्या घरी धाड टाकेल त्यासंबंधी ट्वीट करत असेल, पत्रकार परिषद घेणार असतील तर हे संशयास्पद आहे, असेही ते म्हणाले.
मोहित कंबोज यांचा दावा काय आहे?
मोहित कंबोज यांनी मंगळवारी काही ट्वीट केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा नेता लवकरच तुरुंगात नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना भेटणार आहे, असं दावा त्यांनी केला आहे. लवकरच आपण राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा पर्दाफाश करणार आहे. त्या नेत्याची भारतातील संपत्ती, देशाबाहेरील संपत्ती, बेनामी कंपन्या, त्याच्या गर्लफ्रेंडच्या नावावरील संपत्ती, त्याने मंत्रीपदावर असताना केलेला भ्रष्टाचार, त्याच्या कुटुंबाच्या संपत्तीची यादी याची माहिती देणार आहे असेही ते म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








