ऑनलाईन टीम/तरुण भारत
शिंदे गटाचे आमदार रामदास (Ramdas Kadam)कदम यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे मराठाद्वेष्टे आहेत. त्यांना मराठा व्यक्ती मोठा झालेला आवडत नाही. हे आपण जबाबदारीने बोलत आहोत, असं विधान रामदास कदम यांनी केलं आहे. तसेच शरद पवारांसारखी व्यक्ती या वयात राज्यात फिरून अधिकाऱ्यांच्या बैठका घेत होते. उद्धव ठाकरे मुख्मयंत्री म्हणून मातोश्रीत बसून राहिले. त्यांना इतरांना गद्दार म्हणण्याचा काय अधिकार? असा परखड सवाल शिंदे गटाचे आमदार रामदास कदम यांनी विचारला आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. “मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांच्या पाठीत खंजीर खुपसला. गद्दार उद्धव ठाकरे आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाही. उद्धव ठाकरे अडीच वर्षात तीन वेळा मंत्रालयात आले. गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली,” अशी कोपरखळी रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना मारली आहे.
“आदित्य ठाकरे याचं वय आता ३१ वर्षे आहे, तेव्हाच आपलं राजकीय वय ५२ वर्षे आहे. आपलं वय काय, काय बोलतो, आपण ठाकरे कुटुंबातील आहोत, याचं भान आदित्य ठाकरेंनी ठेवायला हवे,” असा टोला रामदास कदम यांनी लगावला आहे.
हे ही वाचा : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालांनी घेतली राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांची भेट
‘१९७० पासून मी शिवसेनेचं काम करतोय. मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्याने प्रेरित होऊन आम्ही काम सुरू केलं. आम्ही अनेक केसेस अंगावर गेतल्या. जेल भोगली. आदित्य ठाकरेंनी किती जेल भोगली? उद्धव ठाकरे ज्यावेळी म्हणाले बाळासाहेब साधे होते, मी हुशार आहे. त्यादिवशी महाराष्ट्राच्या जनतेला कळालं,’ असं रामदास कदम म्हणाले.
‘शिवसेनाप्रमुखांच्या पुण्याईवर गादीवर बसले. त्यामुळे दसरा मेळावा एकनाथ शिंदे यांनी घ्यावा अशी विनंती मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना करणार आहे, असंही कदम यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले की, बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंनी दिली. बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंना नाही. उद्धव टाकरेंच्या पक्षाचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उद्धव सेना आहे. त्यांना बाळासाहेबांचे विचार सांगण्याचा अदिकार नाही. खरी शविसेना कुणाची याबाबत न्यायदेवता निर्णय देईल. आम्हीच बाळासाहेबांची शिवसेना आहोत,’ असा दावाही रामदास कदमांनी पुन्हा केला.








