एका रात्रीत खेड रस्त्यावरील खड्डे गायब झाल्याने वाहनचालकांतून प्रतिकिया
मौजेदापोली वार्ताहर
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नुकताच खेड दौरा झाला. त्यामुळे एकाच रात्रीत रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दापोली दौराही केला असता तर फार बरे झाले असते. जेणेकरून दापोली-खेड मार्गावरील खड्डे बुजवले गेले असते, अशा पतिकिया वाहनचालकांतून उमटत आहेत.
मंत्र्यांसाठी पशासकीय यंत्रणेने तातडीने रस्ते दुरूस्ते करणे, स्वच्छता करणे ही जिल्ह्यासाठी नवीन बाब नाही. मात्र या मंत्र्यांना जी सर्वसामान्य जनता निवडून देते, त्यासाठी ही पशासकीय यंत्रणा तत्परता दाखवताना दिसत नाही. मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खेड दौऱयावेळी ही बाब पकर्षाने जाणवली. या दौऱयाच्या पार्श्वभूमीवर एका रात्रीत खड्डे बुजवण्यात आले. मात्र दापोली-खेड मार्ग गेले अनेक दिवस खड्ड्यात आहे. त्याकडे इतके दिवस लक्ष द्यायला पशासकीय यंत्रणेला वेळ मिळालेला नाही. तसेच दापोलीतील ग्रामीण भागांमध्येही रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी खेड-दापोली दौरा केला असता तर हा रस्ताही तातडीने खड्डेमुक्त झाला असता, अशा खोचक पतिकिया उमटत आहेत.