Supriya Sule :शिंदे-भाजप गटाचा आज शपथविधी पार पडला. १८ मंत्र्यांनी शपथ घेतली. छोटेखानी पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये तुर्तास महिलांना स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे ‘पुरुषप्रधान’ मंत्रिमंडळ आहे का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्याच्या स्त्री शक्तीवर हा अन्याय असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. ट्विट करत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, महिलांना योग्य प्रतिनिधित्व मिळेल ही अपेक्षा होती. एकाही महिलेला संधी न मिळणं खेदजनक आहे. राज्याच्या स्त्री शक्तीवर हा अन्याय आहे. सुप्रिया सुळेंनी ट्विट करत हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी भाजपाचे आभार मानले. आमच्या हिऱ्यांना मंत्रिपद दिला याबद्दल भाजपाचे आभार असेही त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा- पूजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्याला मंत्रीपद देणं अत्यंत दुदैवी-चित्रा वाघ
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी पार पडला. उशीरा का होईना राज्याला मंत्री मिळाले ही आनंदाची बाब आहे. मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ही दिल्या.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








