शिंदे-भाजपचा मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. यानंतर महिलांचा मुद्दा, संजय राठोड पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण, अपक्षांना हुकलेली संधी यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. यासंदर्भात प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी सूचक शब्दांत आपली नाराजी बोलून दाखवली आहे. बच्चू कडू यांनी याआधीही अनेकदा समाजकल्याण खातं मिळावं अशी अपेक्षा जाहीरपणे व्यक्त केली आहे. अपंग आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आपल्याला हे खातं हवं असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. मात्र, पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये त्यांचा समावेश न झाल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
बच्चू कडू म्हणाले, “खरंतर अपक्ष आणि मित्रपक्षांनी मिळून हे सरकार बनलं आहे. आमची मागणी होती की पहिल्या टप्प्यात मित्रपक्ष आणि अपक्षांना मंत्रिपद घ्यायला हवं होतं. काही कारणं असू शकतात. ती समजून घेऊ. त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की महिन्याभरात जेव्हा मंत्रीमंडळ विस्तार होईल, तेव्हा अपक्ष आणि मित्रपक्षाचा नक्की विचार केला जाईल. काही अडचणींमुळे या टप्प्यात विचार केला नसेल, तर बघू”, असं बच्चू कडू म्हणाले आहेत. दरम्यान, शपथविधी सुरू असताना बच्चू कडू मात्र विधान भवनात असल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यावर देखील त्यांनी खुलासा केला आहे. “विधानभवनात काही कामं होते. त्यामुळे शपथविधीला न जाता इथे येऊन तो वेळ आम्ही इथे कामी लावला”, असं ते म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








