Maharashtra Cabinet : राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार काल पार पडला. यामध्ये १८ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह २० मंत्र्यांचा समावेश झाला आहे. रम्यान, आज या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकित राज्यातील पूरग्रस्तांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.पूरग्रस्तांना आता हेक्टरी १३,६०० रुपये मदत मिळणार आहे.तसेच एनडीआरएफच्या निकषांपेक्षा दुप्पट मदत जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
Previous Articleकृष्णा नदीच्या पाणीपातळी वाढ; नागठाणे बंधारा पाण्याखाली
Next Article राशी भविष्य








