राज्यात चांगेल काम करणाऱ्य़ा महाविकास आघाडीचे सरकार पाडणाऱ्या ‘गद्दारांना’ धडा शिकवण्याची हीच वेळ असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी सांगितले. ते चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत बोलत होते. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे सरकार पाडून भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाल्याचा उच्चारही त्यांनी केला.
कसबा आणि चिंचवडमधील भाजपचे विद्यमान आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे लागलेल्या पोटनिवडणुकीमध्ये अजित पवार हे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारसभेतून त्यांनी भाजपवर आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला.
यावेळी बोलताना ते म्हणाले, “कसबा आणि चिंचवड या दोन जागा जिंकून गद्दारांना त्यांची जागा दाखवून द्यायची आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कशा पद्धतीने चांगले काम करत होते हे सर्वांना दाखवून द्यायचे आहे. त्यांना धडा शिकवण्याची हिच वेळ आली आहे.”असा घणाघात त्यांनी केला. तसेच या पोटनिवडणुका महाविकास आघाडीसाठी खूप महत्त्वाच्या असल्याचेही पवार म्हणाले.
पुढे बोलताना अजित पवारांनी आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप आजारी असताना रुग्णवाहिकेतून विधानपरिषदेच्या आणि राज्यसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मुंबईतील विधिमंडळ संकुलात घेऊन गेल्याबद्दल पवारांनी भाजपवर टीका केली.
यावेळी बोलताना ते म्हणाले, “भाजपचा हा खटाटोप दिवंगत मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांना असह्य झाला पण ते पक्षासाठी गप्प राहिले. भाजपला निवडणुकीपेक्षा त्यांचे आरोग्य महत्त्वाचे होते हे समजायला हवे होते. पण या स्वार्थी लोकांनी त्याकडे लक्ष दिले नाही” असा आरोप अजित पावर यांनी केला
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









