Ajit Pawar : राज्याच्या अर्थसंकल्पात वास्तवाचं भान नव्हत. अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला.राज्याच्या परिस्थितीची जाणीव नसलेलं हे बजेट आहे. बोलणाऱ्यांच्या वाणीला आणि ऐकणाऱ्यांच्या कानाला बरे वाटेल असाच आजचा अर्थसंकल्प आहे. शिवरायांच्या नावानं घोषणा दिल्या, पण स्मारकाबाबत किती निधी दिला याचा उल्लेख केला नाही. या अर्थसंकल्पात फक्त भरीव तरतूद करणार असं सांगितलं पण, काय तरतूद करणार हे सांगितलं नाही. महापुरुषांच्या नावानं मोठ्या घोषणा केल्या, तरतूद नाही. जनतेला स्वप्न दाखवणारा हा अर्थसंकल्प असल्याची टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बजेट सादर केल्यांनतर शिंदे-फडणवीस सरकारवर केली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, मागील बजेटमध्ये आम्ही विकासाची पंचसुत्री आणली. या बजेटमध्ये त्यांनी विकासाचं पंचामृत आणलं. अमृत आपण फक्त आतापर्यत ऐकलं आहे. ते पाहिल नाही. तसचं होणार आहे. विकासाचं पंचामृत कधी दिसणार नाही. जनतेला स्वप्नाच्या दुनियेत फिरवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. 2014 पासून यांनी केलेल्या घोषणाचं काय झालं? शेतकऱ्यांचे उत्पन्न् दुप्पट झालं का? असा सवाल यावेळी त्यांनी केला. महाराष्ट्रातील उद्योग राज्याच्या बाहेर चालले याबाबत काहीच चर्चा नाही, असेही ते म्हणाले.
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी तुटपुंजी मदत देण्यात आली. असल्या तुटपुंजी मदतीची शेतकऱ्यांना गरज नाही. अर्थसंकल्पातील आकडे म्हणजे स्वप्नातील इमले आहेत. राज्याची वाटचाल कर्जबाजाराकडे चालली आहे. फडणवीसांनी अर्थसंकल्पाविषयी पुस्तक लिहलं, पण त्यांनी अर्थसंकल्प कसा मांडावा यावरही पुस्तक लिहावं असा सल्ला त्यांनी दिला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








