मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये कोकण विभागाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९७.२१ टक्के लागला असून सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे. मुंबई विभागातील ९०.९१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींच्या निकालाची टक्केवारी ९५.३५ टक्के असून, मुलांची टक्केवारी ९३.२९ टक्के आहे. उत्तीर्ण मुलींची टक्केवारी २.०६ टक्क्यांनी जास्त आहे. बारावीच्या परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना १७ जून रोजी त्यांच्या कॉलेजमध्ये दुपारी तीन वाजल्यापासून गुणपत्रिका मिळणार आहेत.
बारावीचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळे
https://mahresult.nic.in
www.hscresult.mkcl.org
https://hscmahresult.org.in
विभागनिहाय निकालाची टक्केवारी
मुंबई – ९०.९१
कोकण – ९७.२१
पुणे – ९३.६१
नागपूर – ९६.५२
औरंगाबाद – ९४.९७
कोल्हापूर – ९५.०७
अमरावती – ९६.३४
नाशिक – ९५.०३
लातूर – ९५.२५
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








