महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात धनुष्यबाण हे चिन्ह कुणाचे यासाठी निवडणुक आयोगासमोर सध्या सुनावणी सुरू आहे. शिंदे गटाकडून बाजू मांडण्यासाठी अॅड. महेश जेठमलानी हे युक्तीवाद करत आहेत तर ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल हे बाजू मांडत आहे. शिंदे गटाने सादर केलेली कागदपत्रे बनावट आणि बोगस असल्याचे कपिल सिब्बल यांनी दावा केला. यावेळी सुप्रिम कोर्टाने आयोगातील युक्तीवाद प्राथमिक कि अंतिम हे स्पष्ट करा अशी मागणी कपिल सिब्बल यांनी आयोगापुढे केली आहे.
तर धनुष्यबाण मिळवण्यासाठी शिंदे गटाकडून जेठमलानी यांच्याकडून जोरदार युक्तीवाद केला. “ठाकरेंनी जुनी घटना न्यायालयासमोर सादर केली आहे. बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेनेच्या घटनेत बदल करून उद्धव ठाकरेंनी पक्षप्रमुख हे पद निर्माण केले. त्यामुळे ती बेकायदेशीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरेंना आपल्या पदावर राहण्याचा अधिकार नाही. तर जुलै 2022 मध्ये राष्ट्रिय नेता म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड केली गेली होती.” असा युक्तीवाद शिंदे गटाकडून केला गेला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








