महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा रविवारी मोठ्या दिमाखात पार पडला असला तरी या सोहळ्याला 13 जणांचा उष्माघाताने मफत्यू झाल्याने गालबोट लागले. मफत व्यक्तींच्या कुटुंबियांना सरकारकडून 5 लाख ऊपयांच्या मदतीची घेषणा करण्यात आलेली असली तरी या 13 जणांच्या मृत्युची जबाबदारी अद्याप कोणीही स्विकारलेली नाही. सकाळच्या भर उन्हात हा सोहळा घेण्याची काहीही गरज नव्हती आणि 20 ते 22 लाख लोकांची गर्दी केवळ राजकीय स्वार्थासाठी जमविल्याचा आरोप आता विरोधकांकडुन करण्यात येत आहे. या घटनेची जबाबदारी कोणावर तरी निश्चित करण्याची गरज असताना सरकारकडून मात्र केवळ हवामान बदलामुळे हे घडल्याचे सांगण्यात आले आहे.
ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी सकाळी भर उन्हात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते मोठ्या दिमाखदार सोहळ्dयात महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. मात्र या सोहळ्dयाला आलेल्या 13 श्री सदस्यांचा उष्माघाताने मृत्यु झाल्याने आता या सोहळ्dयावऊन चांगलेच राजकारण रंगले आहे. राजकीय स्वार्थासाठी लाखो लोकांची गर्दी जमविल्याचा आरोप सरकारवर करण्यात येत आहे. स्वर्गीय नानासाहेब धर्माधिकारी त्यानंतर डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केलेले कार्य मोठेच आहे. त्यांनी कधीही प्रसिध्दीचा हव्यास केला नाही, मात्र राजकारण्यांनी त्यांच्या श्री परीवाराचा वापर करण्यासाठी महाराष्ट्र भुषण पुरस्काराचा मोठा इव्हेंट करण्याचे ठरविल्याचा आरोप आता होत आहे.
25 लाखाच्या पुरस्कारासाठीच्या कार्यक्रमाला जवळपास 14 कोटी ऊपये खर्च करण्यात आल्याची माहिती आहे. एकीकडे राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या पिकांची राख रांगोळी झालेली असताना एका पुरस्कार सोहळ्dयासाठी 14 कोटी ऊपये खर्च करण्याची गरजच काय? असा सवाल आता विचारला जात आहे.
गेल्याच महिन्यात 24 मार्चला ज्यांनी आठ दशकांहून अधिक काळ आपल्या सुमधुर आवाजानं रसिकांच्या मनावर अधिराज्य केले त्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना याच महाराष्ट्र भुषण पुरस्काराने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गेटवे ऑफ इंडिया इथं झालेल्या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. मग डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यासाठीच दिमाखदार कार्यक्रम का घेण्यात आला? इतकी मोठी संख्या जमविण्याचे प्रयोजन काय? श्री परिवाराने कोरोना काळात केलेले कार्य असो वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती कार्यक्रम तसेच निरूपणाच्या माध्यमातून मोठे कार्य केलेले आहे ते नाकारता येणार नाही. आप्पासाहेब हे नेहमीच प्रसिध्दी माध्यमापासून दूर राहिले, त्यांनी हा पुरस्कार घरगुती कार्यक्रमात किंवा राजभवनला छोटेखानी समारंभातही स्विकारला असता मात्र राजकारण्यांनाच या कार्यक्रमाचा इव्हेंट करायचा होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर जोरदार शक्तीप्रदर्शन करायचे होते का? कार्यक्रमाला उपस्थितांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्याचे कारण काय? एकीकडे राज्यात गेल्या आठवड्याभरातील कोरोना रूग्ण वाढीचा आकडा हा रोज हजार पार होत आहे मग एकाच ठिकाणी इतका जमाव जमवण्याचे कारण काय? आता 13 श्री सदस्यांचा मृत्यु झाल्यानंतर मात्र कोणीही या घटनेची जबाबदारी घ्यायला पुढे येत नाही, मृत्युचे आकडे लपवले जात असल्याचे बोलले जात आहे. हे सर्वसामन्यांचे सरकार असल्याचे वारंवार सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांना याची कल्पना नाही की खारघर येथील या कार्यक्रमामुळे येथील व्यवहार आणि व्यवसाय दोन दिवस ठप्प झाले होते. एकीकडे वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला होता तर दुसरीकडे जास्तीत जास्त लोकांनी या कार्यक्रमाला यावे म्हणून दर रविवारी हार्बर मार्गावर असणारा मेगा ब्लॉक रद्द करण्यात आला. त्यामुळे सरकारने खरच इतका खटाटोप करण्याची गरज होती का?
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानामुळे शेतकरी हवालदिल झालेला असताना सरकारी तिजोरीतील 14 कोटी ऊपयांचा खर्च या कार्यक्रमासाठी करण्याचे कारण काय? सरकारला प्रत्येक कार्यक्रमाचा इव्हेंट करण्याचे कारण काय? गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आपल्या मंत्री, आमदार आणि काही नेत्यांसोबत करोडो ऊपये खर्च कऊन अयोध्या वारी केली. त्याचवेळी महाराष्ट्रातील काही भागाला अवकाळी पावसाने अक्षरश: झोडपून काढले. अयोध्या दौऱ्यावऊनही सरकारवर टीका झाली. मुख्यमंत्र्यांनी आयोध्या दौऱ्यावऊन येताच अवकाळी पावसाचा आढावा घेतला मात्र सततच्या वातावरण बदलामुळे भविष्यात शेती व्यवसायाला मोठा धोका असणार आहे.
शाहु, फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात आता धार्मिक कार्यक्रमाचे अवडंबर केले जात आहे. दोन महिन्यापूर्वी कोल्हापूर येथील कण्हेरी मठात पंचमहाभूत सुमंगलम लोकोत्सव सुरू असताना जवळपास 52 गाईंचा मृत्यु झाला होता. अन्नातून विषबाधा झाल्याने या गाईंचा मृत्यु झाल्याचे सांगण्यात आले मात्र हेच जर दुसऱ्या धर्मियांच्यामुळे झाले असते तर गाईंबाबत संवेदशनील असणाऱ्या सरकारने विरोधकांना पळता भुई थोडी केली असती, गेल्याच महिन्यात मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या मिरा रोड येथे बागेश्वर मठातील धीरेंद्र कृष्ण शास्त्राr यांच्या दरबारावेळी चोरट्यांनी महिलांच्या गळ्dयातील मंगळसूत्र आणि सोनसाखळी असा 5 लाख ऊपयांच्या किंमतीच्या ऐवजावर डल्ला मारला होता.
महाराजांचा हा दरबार नंतर चांगलाच चर्चेत आला, अशा घटना नंतर राजकारणाचा विषय होतात. त्यात महाराष्ट्र भुषण पुरस्कार कार्यक्रम हा राज्य सरकारचा कार्यक्रम असल्याने यावऊन सरकारवर जोरदार टीका होत आहे. कोणी सांस्कृतिक विभागाला दोषी ठरवत आहे तर कोणी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे, मात्र यात ज्या 13 श्री सदस्यांचा मृत्यु झाला त्यांचा जीव मात्र परत येणार नाही.
प्रवीण काळे








