वेंगुर्ले शहर शिवसेनेतर्फे उमेश येरम यांच्या तर्फे आयोजन
वेंगुर्ले (वार्ताहर)-
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांना दिर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभण्यासाठी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वेंगुर्ले शहर शिवसेनेतर्फे मंगळवारी वेंगुर्ले नगरपरिषद मार्केट मधील शेकडो वर्षांच्या जागृत व सुप्रसिद्ध हनुमान मंदिरात 5 ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारात महालघुरुद्र करण्यात आला.
यावेळी उपस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यात शहर प्रमुख उमेश येरम, तालुका संघटक बाळा दळवी, तालुका प्रवक्ते सुशील चमणकर, अण्णा वजराटकर, तालुका ओबीसी सेलचे प्रमुख गणपत केळुसकर, प्रकाश मोठे, युवा सेना प्रमुख संतोष परब, शहर महिला संघटक अँड. श्रद्धा बावीस्कर, अल्प संख्यांक महिला सेलच्या संघटक शबाना शेख, यास शिवसेनेचे कार्यकर्ते व बाजारपेठेतील असंख्य व्यापारी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी स्वतः हून कार्यक्रमात सहभागी घेतला. या कार्यक्रमानंतर उपस्थित भाविकांना गोड प्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे तालुका प्रवक्ते सुशिल चमणकर यांनी वेंगुर्ले बाजार पेठेतील हनुमान मंदिर हे शेकडो वर्षाचे असून या देवतेकडून आळवणी केलेल्या भाविकांच्या मागणी हि निश्चितीच पूर्ण होईल. बाजारपेठेचे नुतनीकरण कामात जागृत व सुप्रसिद्ध असलेल्या व सर्व व्यापाऱ्यांना आनंद देणाऱ्या या हनुमान देवतेचे मंदिर आहे त्याच जागी ठेवून काम केले गेले आहे. त्यामुळे दिपक केसरकर यांना हि देवता वेंगुर्लेच्या सर्वांगिण विकासासाठी निश्चितच उत्तर आरोग्यासह दिर्घायुष्य देईल. असे स्पष्ट करीत शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख उमेश येरम यांनी पक्षातर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे खास अभिनंदन केले.









