क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
रायबाग चिंचली येथे रिव्हरसाईड स्कूल आयोजित महाकाली चषक 17 वर्षाखालील आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत अंतिम सामन्यात सेंट झेवियर्सने रिव्हरसाईड स्कूल चिंचली संघाचा 3-0 असा पराभव करत महाकाली चषक पटकाविला. स्पर्श देसाई जेव्हीएस याला उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
चिंचली येथे आयोजित केलेल्या या फुटबॉल स्पर्धेत सेंट झेवियर्स संघाने पहिल्या सामन्यात अमोग स्कूल रायबाग संघाचा 5-0 असा पराभव केला. या सामन्यात रिहान किल्लेदारने 2, आयान किल्लेदार, स्पर्श देसाई, माज कुडची यांनी प्रत्येकी 1 गोल केला. दुसऱया सामन्यात सेंट झेवियर्स संघाने रिव्हरसाईड ब संघाचा 2-1 असा पराभव केला. माज कुडची व रिहान मुल्ला यांनी प्रत्येकी 1 गोल केला.
उपांत्य सामन्यात सेंट झेवियर्स संघाने लव्हडेल संघाचा 4-0 असा पराभव केला. आयान किल्लेदार, स्पर्श देसाई, रिहान किल्लेदार, माज कुडाची यांनी प्रत्येकी 1 गोल केला. अंतिम सामन्यात सेंट झेवियर्स संघाने रिव्हर्ससाईड चिंचली संघाचा 3-0 असा पराभव केला.
झेवियर्सच्या स्पर्श देसाई, रिहाय किल्लेदार, माज कुडची यांनी प्रत्येकी 1 गोल केला.
सामन्यानंतर मान्यवरांच्या हस्ते चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या संघाला फुटबॉल प्रशिक्षक मानस नायक यांचे मार्गदर्शन लाभले.









