गणपती बप्पा मोरयाचा गजर, फटाक्यांची आतषबाजी
कोल्हापूर प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवाजी चौक तरुण मंडळाचा 21 फुटी कोल्हापूरचा महागणपती मंगळवारी सायंकाळी गणेशभक्तांना दर्शनासाठी खुला करण्यात आला. वरीष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील, पोलीस हवालदार नामदेव यादव यांच्या हस्ते गणेशमुर्ती अनावरण सोहळा झाला. ठाणे, मुंबई येथील प्रिया नंदकिशोर पाटील यंदाच्या गणेशमुर्तीच्या मानकरी आहेत. गणेशमुर्ती अनावरण सोहळ्यानंतर उपस्थित गणेशभक्तांनी गणपती बप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरयाचा अखंड गजर केला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार वळंजू, उत्सवसमिती अध्यक्ष प्रसाद वळंजू, गणेश वळंजू आदींसह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









